पदक विजेत्या खेळाडुंचा जंगी सत्कार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक पटकावलेल्या खेळाडुंची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. तळेगाव (ता. फुलंब्री) येथे नागरिकांनी या खेळाडूंचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. पिंपरी येथील वैभव पिराजी अंभोरे याने वुशू स्पर्धेत देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला.

मनिपूर येथील इम्फाळ येथे राष्ट्रीय वुशू स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वैभव अंभोरेने चमकदार कामगिरी करीत तृतिय क्रमांक पटकावला. कराटे स्पर्धेत सार्थक अंभोरे याने घवघवीत तीन सुवर्णपदक पटकावले. 

दोन्ही खेळाडूंच्या यशाने गावचे नाव देशात उंचावले गेले. वैभवचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. तळेगाव येथे मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढली. माजी जि. प. सदस्य कैलास पा. गव्हाड, मार्केट कमिटीचे माजी संचालक तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष कडुबाशेठ गव्हाड, पिंपरीचे माजी सरपंच गजानन अंभोरे, सरपंच वाल्मीक अंभोरे, सदस्य मनोहर अंभोरे, माजी उपसरपंच वाय. डी. अंभोरे, पिराजी अंभोरे, व्यापारी अंकूश अंभोरे, प्रकाश अंभोरे, नामदेव अंभोरे, कडूबा अंभोरे, विष्णू शिंदे, यशवंत अंभोरे, अंभोरे भालचंद्र यांच्यासह नागरिक मिरवणूकीत सहभागी झाले होते.

वुशू स्पर्धेत पदक पटकावलेला वैभव अंभोरे याने हसूल येथील जय भवानी क्रीडा केंद्र तसेच भारत माता क्रीडा केंद्रात प्रशिक्षण घेतले होते. येथील प्रशिक्षक तसेच संचालक नवनाथ औताडे, अर्जुन औताडे तसेच पै. राजू गायकवाड यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच कराटेपटू सार्थक अंभोरे, जिम्नॅस्टिक खेळाडू अवनी सतीश जोशी हिचाही यावेळी गौरव करण्यात आला. खेळाडूंनी परिश्रम करीत नाव कमवावे. मेहनतीला पर्याय नाही असे आवाहन पै. राजू गायकवाड यांनी यावेळी केले.